ग्राम पंचायत पिंपळगाव (वा.)

ता. देवळा, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र

पिंपळगाव (वा.) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा प्रारंभ – १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान उपक्रम राबवले जाणार

पिंपळगाव (वा.), ता. देवळा, जि. नाशिक येथे दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे उद्घाटन विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून करण्यात आले. या अभियानाची अंमलबजावणी 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत करण्यात येणार आहे. ग्रामसभेत सेवा पंधरवडा, स्वच्छता ही सेवा, व विविध लोकसहभाग आधारित उपक्रमांबाबत माहिती देण्यात आली. 100 गुणांची पत्रिका वाचन करून गावात करावयाच्या कामांचे नियोजन ठरवण्यात आले.

पिंपळगाव (वा.) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा प्रारंभ – १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान उपक्रम राबवले जाणार
पिंपळगाव (वा.) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा प्रारंभ – १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान उपक्रम राबवले जाणार
पिंपळगाव (वा.) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे उद्घाटन व विशेष ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग, जिल्हा परिषद नाशिक, व पंचायत समिती देवळा यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव (वा.) ग्रामपंचायतीत दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी "मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान" अंतर्गत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.

या अभियानाची अंमलबजावणी 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत राबवली जाणार आहे.
अभियानाचे मुख्य उद्दिष्ट सशक्त पंचायत, शाश्वत विकास हे असून, ग्रामस्तरावर सर्वसमावेशक विकास घडवणे हे प्रमुख ध्येय आहे.

ग्रामसभेत सेवा पंधरवडा, स्वच्छता ही सेवा आणि विविध जनसहभागातून राबवायचे उपक्रम याबाबत माहिती देण्यात आली.
महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रम व उपक्रम राबवण्यावर भर देण्यात आला.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानातील 100 गुणांची पत्रिका वाचण्यात आली आणि त्यामधील बाबींचे गाव पातळीवरील नियोजन ठरवण्यात आले.

या विशेष ग्रामसभेला सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा व कार्यकर्ता, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा उपक्रम गावाच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरत आहे.