महा आवास अभियानात पिंपळगाव ग्रामपंचायतीला गौरव
देवळा, 13 सप्टेंबर २०२५ – महा आवास अभियान २०२४-२५ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल देवळा तालुक्यात पुरस्कार पिंपळगाव ग्रामपंचायतीने पटकावला आहे.
महा आवास अभियानात पिंपळगाव ग्रामपंचायतीला गौरव
देवळा, 13 सप्टेंबर २०२५ रोजी तहसील कार्यालय, देवळा येथे आयोजित कार्यक्रमात मा. आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते पिंपळगाव ग्रामपंचायतीला प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. या वेळी तहसीलदार मा. प्रशांत पवार, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
ग्रामपंचायत पिंपळगावने घरकुल योजनेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे हा सन्मान मिळाला. गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून हा पुरस्कार पिंपळगावच्या प्रगतीचे प्रतीक असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.