ग्राम पंचायत पिंपळगाव (वा.)

ता. देवळा, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र

पिंपळगावात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न

पिंपळगाव, 16 जुलै २०२५ – गावाच्या हरितीकरणासाठी व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पिंपळगाव येथे ग्रामपंचायत, शाळकरी मुले व स्थानिक तरुणांच्या पुढाकाराने वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

पिंपळगावात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न
पिंपळगावात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न
या उपक्रमात विविध प्रकारची फळझाडे, औषधी झाडे व छायादायी झाडे लावण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, शालेय विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. सर्वांनी मिळून "झाडे लावा, झाडे जगवा" हा संकल्प करून झाडांची निगा राखण्याची जबाबदारी स्वीकारली. कार्यक्रमात सरपंचांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “आज लावलेले प्रत्येक झाड उद्या पिढ्यांना जीवनदायी सावली, शुद्ध हवा आणि पाणी देईल. प्रत्येकाने आपल्या कर्तव्याप्रमाणे एक तरी झाड जगवावे.” ग्रामपंचायतीतर्फे या उपक्रमाला सातत्य देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यामुळे गाव अधिक हरित, सुंदर आणि पर्यावरणपूरक होईल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.